घरट्रेंडिंगखाल तसे व्हाल

खाल तसे व्हाल

Subscribe

खाल तसे व्हाल हे वाचायला आणि ऐकायला जरी मजेशीर वाटतं असलं तरी ते खरं आहे. आपण जो आहार घेतो त्याचा परिणाम आपल्या आचरणावर होतो. अन्नाचा आणि भावनांचा थेट संबंध असतो असे अनेक प्राचीन ग्रंथांमध्येही लिहले आहे. यामुळे स्वभावात बदल करायचा असेल तर आहारात बदल करणे गरजेचे आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रजोगुण, सत्वगुण आणि तामसी गुण या तीन गुणांवर व्यक्तीमत्व घडत असते. त्यावरच आपली जडणघडण होत असते. म्हणूनच कि काय प्राचीन काळी शाकाहारावर विशेष भर दिला जायचा. कालांतराने गरजेनुसार आहारात बदल होत गेले. त्यानुसार व्यक्तीही बदलत गेल्या. उदाहरणार्थ एखाद्या आनंदाच्या प्रसंगात अनेकजण पार्टी करतात . यावेळी मांसाहार व शाकाहाराबरोबरच मद्याचेही सेवन केले जाते. त्यामुळे इतर गुणांबरोबरच तामसी वृ्त्ती उफाळून येते. परिणामी अनेकवेळा पार्टीनंतर वादाबरोबरच मारहाणीच्या घटना घडताना दिसतात.

- Advertisement -

तर शाकाहार केल्याने चित्त शांत राहते. यामुळे पूर्वीच्या काळी शाकाहारी लोकांची संख्या अधिक होती. य़ाच अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचे डाएट प्लान . हा डाएट प्लान बघता लक्षात येईल कि यातही मांसाहारापेक्षा शाकाहारावर अधिक भर देण्यात येतो. ज्यामुळे स्थूलपणा तर कमी होतोच पण चिडचिड कमी होऊन स्वभावही स्थिर होतो.

खाण्याचा संबंध तसा आरोग्याशी आहेच. म्हणूनच जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा डॉक्टर काय खाऊ नये याबद्दल सांगतात. कारण नको ते पदार्थ खाल्ल्यामुळेच तर तब्येत बिघडलेली असते. पण जर तुम्ही ते खाणे टाळले असते. तर कदाचित व्याधी झाली नसती.

- Advertisement -

यावरूनच आहाराचा संबंध जसा आरोग्याशी आहे तसाच तो भावनांशी असल्याचे स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे तर मांसाहार करणाऱ्या व्यक्ती स्वभावाने चिडखोर व संतापी असतात. तर त्या तुलनेत शाकाहारी व्यक्ती शांत असते. क्वचितच चिडतात. यामुळे शांत आयुष्य जगायचे असेल तर पचेल व रुचेल असाच आहार घ्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -