घरUncategorizedसभागृहाबाहेरील व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते

सभागृहाबाहेरील व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते

Subscribe

अजित पवार यांचे सूचक व्यक्तव्य,

मला शिवसेनेचे संजय राऊत यांचा एसएमएस आला आहे. त्या एसएमएसमध्ये त्यांनी, ‘जय महाराष्ट्र, मी संजय राऊत’ असे लिहिले आहे. पण त्यांनी हा एसएमएस का केला हे मला माहित नाही. मी फोन करून त्यांना, तो एसएमएस का केला हे विचारणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तसेचसभागृहाबाहेरील एखादी व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री होऊ शकते, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर ते अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, बैठकीदरम्यान, मला संजय राऊत यांचा एसएमएस आला. पण तो त्यांनी केला हे मला माहित नाही. मी बैठकीत असल्यामुळे त्यांना फोन करून विचारले नाही. पण आता मी त्यांना तो एसएमएस का केला हे विचारणार आहे, असे सांगत अजित पवार यांनी तो एसएमएस पत्रकारांना दाखवला.

- Advertisement -

तसेच केंद्रात सक्रिय असलेली एखादी व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री होऊ शकते. महाराष्ट्रात याआधी असे झाले आहे. जे या सभागृहात सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री होणार का, हा प्रश्न अजित पवार यांनी फेटाळून लावला. शरद पवार मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही, असे अजित पवार म्हणाले.

बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांना आणि निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना मागदर्शन करताना अजित पवार यांनी नव्या जोमाने कामाला लागा, असा संदेश दिला. ज्या कुणाला पक्ष सोडून जायचा असेल त्यांनी आताच जावए, जे लोक पक्ष सोडून गेले आहेत त्यांचे ‘येऊ का जेऊ का’ सुरू असेल, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -