घरUncategorizedसर्वश्रेष्ठ दान, नेत्रदान

सर्वश्रेष्ठ दान, नेत्रदान

Subscribe

डॉ.वर्धमान कांकरिया

शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असला तरी शरीर यंत्रणेइतकंच साहित्यात स्थान मिळण्याचं सौभाग्य काही मोजक्या अवयवांच्या वाट्याला आलं! त्यात हृदयाच्या बरोबरीने डोळ्यांचा नामनिर्देश करावा लागेल. मात्र इतकं महत्त्व असणाèया या अवयवाकडे दुर्लक्ष करणाèयांचं प्रमाण किती मोठं आहे हे देशातील अंध अथवा दृष्टिदोषाने पीडितांच्या प्रचंड संख्येवरून समजतं. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त घेतलेला हा मागोवा…

- Advertisement -

शरीरयंत्रणा सुस्थितीत राहण्यासाठी प्रत्येक अवयवाची तंदुरुस्ती महत्त्वाची असली तरी काही अवयव विशेष नाजूक आणि महत्त्वपूर्ण असतात. त्यांच्या कार्यप्रणालीतील हलका बिघाडही अनेकानेक समस्यांना कारक ठरू शकतो. डोळे याच गटात मोडतात. दृष्टी हे एक वरदान असेल तर दृष्टिदोष अथवा दृष्टिहीनता कोणत्याही शापापेक्षा कमी लेखून चालणार नाही. जन्मत: असणारं अथवा अपघाताने आलेलं अंधत्व आणि काही विकारांच्या प्रभावामुळे आलेली दृष्टिक्षीणता आयुष्य रंगहीन करून टाकते. या गर्द अंधारातून वाट काढताना मनातील आशेची तिरीपही हळूहळू विझते आणि अंध:कार अवकाशाला व्यापून टाकतो. हे अपंगत्व इच्छाशक्तीला नख लावू शकतं. म्हणूनच डोळ्यांच्या आरोग्याचं जतन, दृष्टिदोषांवर तातडीचे आणि सुयोग्य उपचार, नेत्रहिनांसाठी विशेष सुविधांची उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्रदानाच्या चळवळीला बळकटी या बाबींकडे कटाक्षाने लक्ष पुरवणं गरजेचं ठरतं. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त या सर्व मुद्द्यांचा परामर्श घेण्याची गरज आहे.

भारतात अंधांची संख्या बरीच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार बुबुळामुळे येणारं अंधत्व (कॉर्नियल ब्लाइंडनेस) हे अंधत्वाचं चौथं सर्वात मोठं कारण आहे. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मॅक्युलाच्या (नेत्रपटलाच्या मध्यभागी असलेला लहानसा भाग) èहासामुळे येणारं अंधत्व हीदेखील एक मोठी समस्या आहे. बुबुळातील दोषांमुळे अंधत्व आलेल्यांची संख्याही बरीच जास्त आहे. मात्र असं असलं तरी नेत्ररोपणाद्वारे अंधत्वावर मात करता येते. बुबूळ हा डोळ्याचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक भाग आहे. प्रकाशाचं योग्य परावर्तन होऊन समोरचं दृष्य नेत्रपटलावर योग्य रितीने पडण्यासाठी बुबूळ पूर्णपणे पारदर्शक असणं आवश्यक असतं. परंतु काही प्रकारच्या संसर्गामुळे किंवा अपघातामुळे बुबूळ धूसर किंवा अपारदर्शक होऊन व्यक्तीला अंधत्व येऊ शकतं. अशा प्रकारच्या अंधत्वावर बुबुळाचं रोपण हा योग्य पर्याय असतो. अंध व्यक्तीचं बुबूळ काढून त्या जागी मृत व्यक्तीने दान केलेल्या बुबुळाचं रोपण केल्यास त्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते.

- Advertisement -

एका सर्वेक्षणानुसार देशात सुमारे 15 दशलक्ष व्यक्ती अंध असून त्यापैकी 6.8 दशलक्ष व्यक्तींना बुबूळ अपारदर्शक झाल्याने अंधत्व आलं आहे. या व्यक्तींचं अंधत्व घालवणं शक्य आहे. पण त्यासाठी नेत्रदानाचं प्रमाण वाढायला हवं. एखादी व्यक्ती स्वत:च्या हयातीतच नेत्रदानाचा संकल्प करू शकते किंवा त्या व्यक्तीच्या निधनानंतर तिचे जवळचे नातेवाईक नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात. नेत्रदानाचा निर्णय झाल्यानंतर नेत्रपेढीला त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ठरावीक वेळेत कळवणं आवश्यक असतं. कारण मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे काढावे लागतात. तोपर्यंत मृत व्यक्ती असलेल्या खोलीतील पंखे बंद करून थंडाव्यासाठी एसी सुरू करावा. मृत व्यक्तीचे डोळे हलकेच बंद करावेत आणि डोळ्यांवर कापडाच्या ओल्या पट्ट्या ठेवाव्यात. तसंच मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवून डोकं थोडं उंच ठेवावं. नेत्रपेढीला कळवल्यानंतर त्यांच्याकडून प्रशिक्षित कर्मचारी येऊन मृत व्यक्तीचे डोळे काढून घेतात. ते योग्य प्रकारे जतन करून ठेवले जातात. प्रत्येक नेत्रपेढीकडे बुबूळ रोपणाची गरज असणाèयांची यादी तयार असते. यादीतील क्रमांकानुसार त्या व्यक्तींच्या डोळ्यांवर बुबूळ रोपण केलं जातं. एका व्यक्तीने दान केलेल्या डोळ्यांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. पण, अंध व्यक्तींच्या संख्येच्या मानाने नेत्रदान करणाèयांची संख्या फारच कमी असल्याने बुबूळरोपणाची प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे.
नेत्रदान करण्यासाठी लोकांनी पुढे न येण्याची काही कारणं आहेत. त्यात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे डोळे काढून घेतल्यावर मृत व्यक्तीचा चेहरा विदृप होतो असं अनेकांना वाटतं. पण ही भीती निराधार आहे. आता संपूर्ण डोळा न काढता केवळ बुबूळं काढून घेतली जातात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या चेहèयात कोणताही बदल झालेला दिसत नाही. दुसरं म्हणजे मृत्यूपूर्वी एखाद्याने नेत्रदानाचा संकल्प केला नसल्यास आपण त्या व्यक्तीचे डोळे कसे दान करावेत, असा प्रश्न नातेवाईकांना पडतो. पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात. काहींच्या मते मृत व्यक्तीचे अवयव दान केल्यानंतर त्या व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. पण या अवयवांनी एकाहून अधिक व्यक्तींचं जीवन सुंदर होणार असेल तर ते देवाला आवडणारच, हा विचार लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे अधिकाधिक व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा.

संपूर्ण अंधत्व अथवा दृष्टी अंधूक असणं, दृष्टिदोष असणं, डोळ्यासंबंधीच्या गंभीर तक्रारी असणं या बाबी जीवनानंदावर विरजण घालणाèया आहेत. ही नितांतसुंदर सृष्टी पाहण्यासाठी देवाने दिलेल्या या देणगीला पारखं होण्यासारखं दुसरं दु:ख नाही. मात्र हे माहीत असून सध्याची जीवनशैली डोळ्यांच्या आरोग्यरक्षणाला पूरक अथवा सहाय्यक नाही. डोळ्यांच्या आरोग्याचं जतन आणि संवर्धनासाठी आहारापासून व्यायामापर्यंत विविध प्रकारे काळजी घ्यावी लागते हा विचार जनमानसात खोलवर रुजलेला नाही. म्हणूनच या अवयव यंत्रणेला गृहीत धरण्याची चूक होते आणि इथेच खरा घात होतो. अगदी लहान वयापासून नजरेसमोर येणारे विविध गॅझेट्स आणि उपकरणांचे प्रकाशमान पडदे, संगणकाधिष्ठित कार्यशैलीत दिवसभर डोळ्यासमोर संगणक असल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण, सर्व प्रकारच्या प्रदुषणाचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम, आहारातून पर्याप्त जीवनसत्त्वांचा पुरवठा न झाल्यामुळे उद्भवणारे दृष्टिदोष या सर्वांप्रती सजग होण्याची आवश्यकता आहे. मात्र ती दिसत नाही म्हणूनच लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना दृष्टिदोषाची समस्या भेडसावताना दिसते. या समस्यांचं वेळीच निराकरण न केल्यास प्रसंगी अंधत्वही येऊ शकतं. मात्र नेत्रोपचाराच्या क्षेत्रात झपाट्याने होत असणाऱ्या प्रगतीमुळे यातील बèयाचशा व्याधींवर नियंत्रण ठेवणं आता शक्य झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -