घरUncategorizedकाळ्या यादीतील 'प्रजा'कडून नगरसेवकांची टूर

काळ्या यादीतील ‘प्रजा’कडून नगरसेवकांची टूर

Subscribe
मुंबई महापालिकेकडून आरटीआयअंतर्गत माहिती मिळवून प्रशासन आणि नगरसेवकांच्या कामाचे वाभाडे काढणाऱ्या प्रजा फांऊडेशनला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. काळ्या यादीत टाकण्यात आल्यानंतर प्रजा फाऊंडेशनने, नगरसेवकांना हाताशी धरून प्रशासनावर आपला वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रजाने विविध पक्षातील आठ नगरसेवकांना अभ्यास दौरा म्हणून केरळ टूरला पाठवले आहे.
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांसाठी दरवर्षी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. यंदा प्रजा फाऊंडेशनने नगरसेवकांसाठी केरळमध्ये अभ्यास दौरा घडवून आणला आहे. केरळमधील त्रिशूल महापालिका, पुण्यातील यशदाप्रमाणे तेथील केरळ मधील एव्हीन्यू ऑफ लोकल असोशिएशनमध्ये राजकारणाचे धडे दिले जातात; तेथेही भेट दिली जाणार आहे. केरळमध्ये त्रिशूल महापालिका २००० सुरु झाली. या महापालिका क्षेत्रात लोकसंख्या साडेतीन लाख असून पालिकेचा ६० कोटीचा अर्थसंकल्प तर ६५ नगरसेवक आहेत. महापालिकेची माहिती नगरसेवकांना करुन दिली जाणार आहे.
शिवाय, येथील मेअर इन काऊंसिल, स्वच्छतेची पहाणी,  कुटुंब श्री या बचत गटाची माहिती दिली जाणार आहे. या दौऱ्यात तेथील महापौर, उपमहापौर, गटनेते, समिती अध्यक्ष यांची भेट घेतली जाणार आहे. पाणी पुरवठा प्रकल्पाला भेटी दिल्या जाणार आहेत. १८ मे रोजी हा दौरा संपणार आहे. शिवसेनेकडून संजय घाडी व सचिन पडवळ, भाजपच्या रेणू भसीण, काँग्रेसचे विठ्ठल लोकरे व विरेंद्र लोकरे, राष्ट्रवादीच्या शायरा आझमी व नाझीरा शेख, सपाच्या शायरा शेख रुकसाना व सिद्दीकी तर प्रजा फांउडेशनतर्फे श्रृती शर्मा, मिलिंद म्हस्के, बळवंत किरार आणि जेनिफोर स्पेनफर आदी या अभ्यास दौ-यात सहभागी झाले आहेत.
प्रजा फाउंडेशनला महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. शिवाय, फाऊंडेशनेकडून दिली जाणारी माहिती खोटी असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले होते. त्यामुळे धास्तावलेल्या प्रजाने नगरसेवकांना हाताशी धरल्याचे बोलले जात आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -