घरUncategorizedबिबट्याच्या गर्भवती मादीसाठी अशीही भूतदया

बिबट्याच्या गर्भवती मादीसाठी अशीही भूतदया

Subscribe

गिरणाऱ्यातील घटना, मादीने दिला दोन बछड्यांना जन्म

बिबट्या दिसताच घाबरून त्याला दगड मारणे आणि काठ्या घेऊन त्याच्या मागे लागणे यासारखे प्रकार नित्यनेमाने घडताना दिसतात; मात्र गिरणारे परिसरात सुशील कोरडे यांच्या शेतात गरोदर अवस्थेतील बिबट्याची मादी आढळून आली.

गरोदर असलेल्या मादीला बघून गिरणारे परिसरातील नागरिक नितिन गायकर या तरुणाने दगडफेक न करता व अतिउत्साह न दाखवता तिच्याकडे शेतमजुर जाणार नाही आणि ती असलेली जागा मानवी हस्तक्षेपापासून दूर कशी राहील याची काळजी घेतली; त्यामुळे त्याच जागेवर या मादीने दोन बछड्यांना जन्म दिला. गुरुवारी सकाळी त्या ठिकाणी मादी नसल्याने गायकर आणि कोरडे यांनी बिबट्या असल्याची जागा बघितली त्यावेळी त्यांना तिथे दोन बछडे आढळून आले. गिरणारे येथील नागरिकांनी बछड्यांच्या आणि मादी बिबट्याच्या सुरक्षिततेसाठी ती जागा निर्मनुष्य करून अनोखी भूतदया दाखवून दिली आहे.

- Advertisement -

आज एक वेगळाच आनंद झालेला आहे

गेल्या आठवड्यात मी आणि माझ्या भावाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या बघितला. तो अवघडलेल्या अवस्थेत चालत होता तेव्हा आम्हाला संशय आला की ही मादी असून ती गरोदर आहे. आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून होतो. शेतात काम करणार्‍या लोकांना देखील या गोष्टीची जाणीव करून दिली आणि बिबट्या मादीचे वास्तव्य असलेला भाग निर्मनुष्य केला. आज सकाळी कोरडे यांच्या शेतात त्यांना दोन बछडे आढळून आल्याने त्यांनी लगेच आम्हाला संपर्क केला. आज एक वेगळाच आनंद झालेला आहे. – नितिन गायकर, ग्रामस्थ गिरणारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -