घरUncategorizedदिल्ली हिंसाचार: आयबी कर्मचाऱ्यावर चाकूचे ४०० वार करुन निर्घृण हत्या

दिल्ली हिंसाचार: आयबी कर्मचाऱ्यावर चाकूचे ४०० वार करुन निर्घृण हत्या

Subscribe

दिल्लीत झालेल्या हिंसाचारादरम्यान गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या संपूर्ण शरीरावर चाकूचे ४०० वार करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दिल्लीतील हिंसाचारात गुप्तचर विभागातील कर्मचारी अंकित शर्मा यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिल्लीतल्या चांदबाग परिसरातील एका नाल्यात त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी सांगितले कि, “आम्ही आमच्या आयुष्यात अशी क्रूरता बघितली नव्हती. शर्मा यांच्या शरीरावर चाकूचे तब्बल ४०० वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.” २५ वर्षीय शर्मा हे दिल्लीतल्या चांदबाग परिसरातच राहत होते. गुप्तचर विभागात ते सुरक्षा सहाय्य्क म्हणून काम करत होते. कामावरून घरी परतल्यावर हिंसाचाराची माहिती मिळवण्यासाठी ते घराबाहेर पडले त्यांनतर त्यांची हत्या झाली होती.

आप नेत्यावर FIR दाखल

अंकित शर्मा यांच्या हत्येमागे आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसैनचा हात असल्याची तक्रार अंकितच्या कुटुंबाने केली आहे. त्यामुळे याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ताहीर हुसैनच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अंकित शर्माचे कुटुंब मंगळवारपासून त्यांचा शोध घेत होते. त्यांचा मृतदेह दुसर्‍याच दिवशी सापडला. त्यांचे वडील रविंद्र शर्मा हे देखील इंटेलिजन्स ब्युरोमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. अंकित शर्मा २०१७ मध्ये आयबीमध्ये दाखल झाले होते. रविंद्र शर्मा यांनी आपल्या मुलाच्या क्रूर हत्येसाठी आम आदमी पक्षाला जबाबदार धरले आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -