घरUncategorizedvideo : काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्यांवर उगारला हात

video : काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आप कार्यकर्त्यांवर उगारला हात

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदनाला सुरुवात झाली आहे. अशातच दिल्लीत मतदान केंद्राबाहेर काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झालेला प्रकार समोर आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदनाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रचारात दहशतवादी, शाहीन बाग, गोळी, फायरिंग, बलात्कार, बिर्याणी आणि हनुमान चालिसासारख्या शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुसरीकडे पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि शिक्षण या शब्दांचा वापर कमी होताना दिसत आहे. दिल्लीतील एकून ७० विधानसभा मतदारसंघांमधून ६७२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले असून दिल्लीतील जवळ-जवळ १ कोटीपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

अशातच दिल्लीत मतदान केंद्राबाहेर काँग्रेसच्या उमेदवार ‘अलका लांबा’ आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झालेला प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संतापलेल्या अलका लांबा यांचा संयम सुटला आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारण्यासाठी हात उगारला असल्याचे चित्र व्हिड्ओमध्ये पहायला मिळत आहे. अलका लांबा यांच्या मुलाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्या चिडल्या आणि आपच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी हात उगारला.

- Advertisement -

ही घटना आज ‘मंजू का तिला’ येथील मतदान केंद्राबाहेर घडली आहे. अलका लांबा आधी आम आदमी पार्टीच्या आमदार होत्या. पण अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर त्या पक्षातून बाहेर पडल्या आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. अलका लांबा आपच्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्यांना अडवायचा प्रयत्न करत कार्यकर्त्यांनाही शांत राहण्यास सांगितले. अलका लांबा या आता चांदनी चौक विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या मूळच्या काँग्रेसच्याच होत्या परंतु २०१५ मध्ये आपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. अलका लांबा यांनी टागोर गार्डन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. अलका लांबा यांच्यासमोर आपचे प्रल्हाद सिंह आणि भाजपाच्या सुमन गुप्ता यांचे आवाहन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -