घरUncategorized‘प्रमाणपत्रदान’ करत केटीआय ठरली देशातील पहिली तंत्रशिक्षण संस्था

‘प्रमाणपत्रदान’ करत केटीआय ठरली देशातील पहिली तंत्रशिक्षण संस्था

Subscribe

वयाची बंधने झुगारून तंत्रशिक्षणात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना केटीआयतर्फे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासाठी खास 'प्रमाणपत्रदान' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

तंत्रशिक्षण हे अत्यावश्यक कौशल्य असून त्यात कोणताही कमीपणा नाही. त्यामुळेच वयाची बंधने झुगारून देत तंत्रशिक्षणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ आज कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये ‘प्रमाणपत्रदान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य तसेच राज्याबाहेरील एकूण ३४ शाखांमध्ये एकाच दिवशी ‘प्रमाणपत्रदान’ सोहळा पार पडला. हा उपक्रम राबविणारी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट भारतातील पहिलीच तंत्रशिक्षण संस्था ठरली.

सर्व ३४ शाखांमध्ये मिळून तब्बल ८०० विद्यार्थ्यांना विविध तंत्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले. यापैकी ठाणे, अंबरनाथ, कुर्ला, भिवंडी व नेरुळ अशा पाच शाखांमधील विद्यार्थ्यांचा ठाण्यातील शाखेत सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रवीण वडावकर व कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद वागास्कर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी या सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान दिसत होता.

- Advertisement -

केटीआयमध्ये शालेय शिक्षणाची अट दहावी नापास असल्याने समाजातील सर्व स्तरातील तरुणांना इथे करियरची दालने उघडी होतात. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्या अनेक तरुणांना आयुष्य घडवायची दुसरी संधी यामुळे प्राप्त होते. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमार्फत विविध तंत्रशिक्षणावर आधारित असे ६० हून अधिक कोर्सेस राबवले जातात. काळाशी सुसंगत प्रशिक्षण, थिअरीसोबतच प्रात्यक्षिकावर भर आणि नोकरीची हमी ही केटीआयची प्रमुख वैशिष्टये. येथून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी आज देशातील तसेच परदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये रुजू आहेत. एवढेच नव्हे तर सुमारे ३०% हून अधिक विद्यार्थी आज यशस्वीपणे स्वतःचा उद्योग करत आहेत.

केटीआयबद्दल थोडक्यात

केटीआय (कोहिनूर टेक्निकल इन्स्टीट्युट) ची स्थापना १९६७ मध्ये झाली. ही संस्था तांत्रिक अभ्यासक्रमांच्या व्यावसायिक प्रशिक्षणातील अर्ध्वयू मानली जाते. सरकारने निश्चित केलेल्या आणि उद्योगमान्य कौशल्यांकरिता भारतातील तरुण मनुष्यबळ तयार करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. केटीआयच्या या प्रयत्नामुळे तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारतो ज्याचे मुख्य लक्ष्य म्हणजे रोजगार. डॉ. मनोहर जोशी यांच्या दूरदृष्टीतून केटीआयची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला या संस्थेचे मुंबई येथे एकच केंद्र होते. पुढे विस्तार वाढत जाऊन भारतातील ६ राज्यांमध्ये सुमारे ७० केंद्रांचे राष्ट्रस्तरीय जाळे उभारले गेले. ही संस्था राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), भारत सरकारची प्रशिक्षण भागीदार आहे. सर्व केंद्रांच्या अभ्यासक्रमांना एनएसडीसी आणि एसएससीची संलग्नता आहे.

- Advertisement -

तंत्रशिक्षणाला वयाचं बंधन नाही

तंत्रशिक्षणाला वयाचं बंधन नाही हे बांदेकर आजोबांनी सिद्ध केलं. वयवर्षे ७५, पण मोबाईलचं वेड आणि त्याच्याशी निगडित शिक्षण घेण्याचं वेड आजोबांना शांत बसू देईना. त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटूयटमध्ये मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. आज त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांची या वयातही नवीन कौशल्य शिकण्याची उर्मी आणि उत्साह कोहिनूरच्या विद्यार्थ्यांसह इतरांनाही प्रेरणादायक आहे.

पिढ्यांना जोडणारे तंत्रशिक्षण

एकाच वेळी जाधव कुटुंबातील पिता-पुत्रांनी केटीआयमध्ये मोबाईल दुरुस्तीचे शिक्षण घेतले. आज एकाच मंचावर एकत्रितपणे त्यांना सन्मानित करण्यात आले. ६८ वर्षांच्या रवींद्र जाधव यांना मुलगा प्रकाश सोबत मोबाईल दुरुस्तीचा उद्योग सुरू करायचा आहे. त्यासाठी त्यांनी एकत्रित हे शिक्षण घेतलं. “शिक्षणाला वय नसतं, त्यामुळे मी आजही शिकतो आहे. हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. तसेच यामुळेच मला जर रोजगार मिळणार असेल तर केवळ वयामुळे लाजायचं कशाला?” असा प्रश्न रवींद्र जाधव विचारतात.

प्रवाहाविरुद्ध पोहणारेही विद्यार्थी

साधारणपणे इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंगचे क्षेत्र पुरुषांनी अधिक व्यापलेले असताना ठाण्यातील प्राजक्ता तेंडोलकर या मुलीने केटीआयमध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंगला प्रवेश घेतला. एवढेच नव्हे तर तिच्या बॅचमधली ती एकटीच मुलगी असताना तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. इलेक्ट्रॉनिकशी संबंधित नोकरी करून सोबत एम कॉमचे शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे.

मर्यादांवर मात

अंबरनाथचा रहिवासी असलेल्या निखिल खैरातची आजची प्रमाणपत्रदान सोहळ्यातील उपस्थिती अनेकांसाठी प्रेरणा देणारी होती. लहानपणी पोलिओच्या आजारात अधू झालेला पाय आणि याच दरम्यान वाणीही गमावून बसलेला निखिल आज हळूहळू बोलतो, न अडखळता चालतो. पण या मर्यादांवर मात करून त्याने केटीआयमधून बेव डिझायनिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्याबद्दल त्याला सहकुटुंब गौरविण्यात आले. निखिलची बहीण आणि आई यांच्यासाठी हा क्षण खूप अभिमानाचा होता.

केटीआयच्या प्रशिक्षणाचं मॉडेल हे पूर्णपणे अनुभवाधारित आहे. म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेलं शिक्षण. या अनुभवाचाच एक भाग म्हणजे हा प्रमाणपत्रदान सोहळा. यामुळे मुलांनी त्यांच्या आवडीचे कौशल्यशिक्षण पूर्ण केल्याचं समाधान आणि नोकरीस पात्र झाल्याचा अभिमान त्यांना वाटेल. म्हणूनच प्रमाणपत्र देण्याच्या साध्या घटनेचा सुंदर सोहळा साजरा करण्यावर आम्ही भर दिला. 
मकरंद वागास्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -