घरUncategorizedमेघा धाडेचा बिग बॉस हाऊसमध्ये धिंगाणा!

मेघा धाडेचा बिग बॉस हाऊसमध्ये धिंगाणा!

Subscribe

बिग बॉस हाउसमध्ये मेघा धाडे आणि दीपक ठाकूर यांच्याच खूप जोरात भांडण वाजले आहे. हा वाद आता कुठवर जातो हे पाहाण्यात प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मराठी बिग बॉसची विजेती मेघा धाडेने हिंदी बिग बॉस १२ मध्ये एक धमाकेदार एन्ट्री मारली आहे. ती बिग बॉसच्या घरात जाऊन आपला वेगळाच अंदाज प्रेक्षकांना दाखवत आहे. तिचे नवे रूप आता आपल्या समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या लक्झरी बजेट कार्यात मेघाने तिचा जलवा दाखवला. तिच्या टीमसाठी तिने कार्यात उत्तम प्रदर्शन केले. पण मेघाचा भांडखोर स्वभाव आपल्याला ठाऊकच आहे. टास्क करताना मेघाने दीपक ठाकूर या स्पर्धकाला खूप सुनावले आणि दुसऱ्या एका स्पर्धकावर म्हणजेच रोहित सुचंतीवर चक्क चप्पल फेकल्याचा आरोप लावला आहे. पण प्रेक्षकांना दिसलेले दृश्य काही वेगळेच आहे!

..आणि मेघा दीपकवर थुंकली!

कार्य संपल्यावर कॅप्टनशिपसाठी दीपक आणि सुरभी राणा यांची निवड झाली होती. त्यामध्ये सुरभीला रिपोर्टर बनवले होते. मेघा आणि दीपक आमने-सामने होते. दीपककडे माईक होता. आणि तो कॅमेऱ्यामध्ये बोलू लागला. तेव्हाच त्या दोघांचे जोरात भांडण वाजले असे समोर आले आहे. तेव्हा मेघाने दीपक आणि रोहितवर खोटे आरोप लावले आणि कुणाला समजू नये म्हणून मराठीत वाइट शब्दांचा प्रयोग केला. एवढेच नाही तर तिने दीपकवर चप्पलने वार केला. तशी ती मेघाची सवय आहेच! शिवाय ती त्याच्यावर थुंकली. रागाच्या भरात दीपकने माइक फेकला.

- Advertisement -

बिग बॉसमध्ये ‘मेघा स्टाईल’ राडा!

या दोघांची दुश्मनी आता खूपच उग्र झाली आहे. त्यांच्यातील वाद काही मिटता मिटत नाही. तो पुढच्या थरावर गेला आहे. मेघा रागाच्या भरात खूप काही बोलून जातेय. बिग बॉसच्या घरात ती नक्कीच तिची स्टाईल दाखवत आहे आणि आपल्याला एंटरटेन करत आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -