घरUncategorizedमतदान यंत्रांची प्राथमिक चाचणी सुरू

मतदान यंत्रांची प्राथमिक चाचणी सुरू

Subscribe

प्रशासनाची निवडणूक तयारी; बंगळुरू, पुण्याहून यंत्रे प्राप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी बंगळुरूहून मतदान यंत्रे तसेच साहित्य प्राप्त झाले आहेत. उर्वरित मतदान यंत्रे पुणे येथून शुक्रवारपर्यंत प्रशासनाला प्राप्त होणार आहेत. प्राप्त मतदार यंत्रांची प्राथमिक चाचणी भेल (बीएचईएल) च्या तंत्रज्ञांमार्फत अंबड येथील गोदामात सुरू करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याशिवाय निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम यांचीही जुळवाजुळव करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर १७४ टक्के याप्रमाणे ८ हजार ३२२ बॅलेट युनिट, ६ हजार कंट्रोल युनिट आणि ६४८० व्हीव्हीपॅट मशिनची आवश्यकता आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याला प्राप्त मतदान यंत्रांपैकी ११८८ मशिन हे वापरण्यात आलेले नाही. त्यामुळे हे मशिन विधानसभेसाठी वापरात आणण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त आवश्क ईव्हीएम हे बंगलोर आणि पुणे येथून मागवण्यात येणार आहे. त्यानुसार आज बंगळुरूहून २५९० कंट्रोल युनिट, २८७० व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहे. तर पुण्याहून २८० बॅलेट युनिट आणण्यात येणार असून याकरता आज पथक रवाना झाली आहेत. या मशिनची भेलच्या तंत्रज्ञांमार्फत पहिल्या टप्प्यातील तपासणी सुरू करण्यात आली आहे.

दृष्टिक्षेपात

  • मतदान केंद्र ४८००
  • कंट्रोल युनिट ६०००
  • बॅलेट युनिट ८३२२
  • व्हीव्हीपॅट ६४८०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -