घरUncategorized'भाजप, संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत'

‘भाजप, संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत’

Subscribe

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. हिंदु पाकिस्तान वाद संपत नाही तोच नव्या वादाला सुरूवात होणार आहे.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केलेल्या भाजप देशाला हिंदु पाकिस्तान बनवत असल्याच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद अद्यापही संपलेला नाही. हिंदु पाकिस्तान वाद संपत नाही तोच शशी थरूर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शशी थरूर यांच्या वक्तव्यावर वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. २०१९च्या निवडणुका भाजप जिंकल्या देश हिंदु पाकिस्तान होईल. शिवाय संविधानाला धोका पोहोचेल शिवाय नव्या संविधान निर्मितीचे काम सुरू होईल असे वक्तव्य शशी थरूर यांनी तिरूअनंतपुरम येथे केले होते. त्यावरून देखील मोठा वाद झाला होता. हा वाद संपत नाही तोच शशी थरूर यांनी केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शशी थरूर यांच्या वक्तव्यानंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शशी थरूर यांचे तिरूअनंतपूरम येथील कार्यालय फोडले होते. त्यानंतर देखील शशी थरूर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू ठेवली आहे.

काय म्हणाले शशी थरूर

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत असल्याचा गंभीर आरोप शशी थरूर यांनी केला आहे. त्यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. तिरूअनंतपूरम येथील कार्यक्रमात ते बोलत होते. शशी थरूर यांच्या या वक्तव्यावला अद्यापतरी भाजपने कोणते उत्तर दिलेले नाही.

- Advertisement -

हिंदु पाकिस्तान वाद

२०१९च्या निवडणुका भाजप जिंकल्या देश हिंदु पाकिस्तान होईल. शिवाय संविधानाला धोका पोहोचेल. नव्या संविधान निर्मितीचे काम सुरू होईल असे वक्तव्य शशी थरूर यांनी तिरूअनंतपुरम येथे केले होते. यानंतर त्यांनी ट्विटवरून भाजपला उत्तर दिले होते. कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना, छोडो बेकारकी बातोमें बीत न जाए रैना अशा शब्दात थरूर टिवटरवरून आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील थरूर यांनी केला आहे.

वाचा –‘२०१९मध्ये भाजप जिंकल्यास भारत ‘हिंदु’ पाकिस्तान होईल’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -