घरलाईफस्टाईलहृदय -बुद्धी तंदुरुस्त ठेवणारे सुपर फूड

हृदय -बुद्धी तंदुरुस्त ठेवणारे सुपर फूड

Subscribe

सामंत मासा (सालमन)
तुम्ही हा मासा करीच्या स्वरूपात खाऊ शकता अथवा याचा वापर तुम्ही सलाडमध्ये देखील करू शकता. ओमेगा- 3 फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असलेल्या सालमन माशाच्या सेवनामुळे हृदय आणि मेंदू तंदुरूस्त राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होते.

मशरूम
याचे सेवन तुम्ही सूप अथवा सलाड स्वरूपात करू शकता. किंवा हलके फ्राय करून देखील खाऊ शकता. मशरूम लो-कॅलरी फूड आहे. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, डी, बी 6 आणि बी 12 भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

- Advertisement -

बीन्स
प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीन आणि अन्य पौष्टिक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. परंतु, लेग्यूम म्हणजे फरसबीमध्ये प्रोटीन आणि फायबर पर्याप्त प्रमाणात असते. त्यामुळे जेवणात याचा समावेश अवश्य करावा.

रताळे
याचा उपयोग तुम्ही बटाट्याच्या ऐवजी करू शकता. यामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे इम्यून सिस्टिम उत्तम राहण्यास मदत होते.

- Advertisement -

बटाटा
बटाटा आरोग्यासाठी हेल्दी नसल्याचे मानले जाते. परंतु तुम्ही तो कशा पद्धतीने शिजवता यावर देखील अवलंबून असते. बटाट्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते. बटाटा कधीच डीप फ्राय अथवा बटरसोबत खाऊ नये.

पालक
कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिनने भरपूर असलेला पालक आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी उत्तम असते. ग्रेवी, पालक पनीर अथवा सँडविच बनवून तुम्ही याचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामिल करू शकता.

लसूण
एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. लसणाच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

संत्री
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ मोठ्या प्रमाणात असते. भूक लागल्यानंतर रोज एक संत्रे खावे. याच्या सेवनामुळे फ्लेवेनोइड्स आणि फायबर मिळण्यास मदत होते. यामुळे पचन यंत्रणा सुधारण्यास मदत होते.

सफरचंद
स्नॅक्सच्या रूपात तुम्ही हे खाऊ शकता. यामध्ये फायबर आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -