घरUncategorizedरस्त्यांच्या कामात जलवाहिन्यांची तोडफोड; पाण्याची नासाडी

रस्त्यांच्या कामात जलवाहिन्यांची तोडफोड; पाण्याची नासाडी

Subscribe

मनसेचे शहरअध्यक्ष बंधू देशमुख यांनी संबंधीत ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

शहरात अनेक ठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवर जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्यामुळे शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. ही गळती सुरू असताना आता रस्त्याचे काम करताना जेसीबीने जलवाहिन्या फोडण्याचाही प्रकार घडत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. मात्र याकडे पाणीपुरठा विभागाचे व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान मनसेचे शहरअध्यक्ष बंधू देशमुख यांनी संबंधीत ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याच्या कामकाजात काळजी

शहरातील कॅम्प नं. ४ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळील पाणीपुरवठा कार्यालय व पाण्याच्या टाकीलगत एमएमआरडीएच्या वतीने रहदारीच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणावरील एका बाजूच्या रस्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्यावरून वाहनचालकांना जाताना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या रखडलेल्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू करण्यात आले आहे. पण त्या रस्त्याचे खोदकाम करताना कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्याने त्या रस्त्यावरील जलवाहिन्या मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

ठेकेदारावर कारवाईची मागणी

पाणीपुरवठा कार्यालयाजवळच तोडण्यात आलेल्या जलवाहिनीतून गुरूवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत होते. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी नागरीकांनी तुटेलल्या जलवाहिनीवर भले मोठे दगड ठेवून पाणी थांबवण्या प्रयत्न केला. पण खूप वेळ त्या जलवाहिनीतून पाणी धो-धो वाहत होते. जवळच पाणी पुरवठा कार्यालय असूनही या तुटलेल्या जलवाहिनीकडे दुर्लक्ष केले जात होते. तीन महिन्यापूर्वी देखील भरतनगर येथे रस्त्याचे काम करताना जलवाहिनी फोडण्यात आली होती. त्यावेळी देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. रस्त्याचे खांदकाम करताना कोणतीही काळजी न घेता जलवाहिनी तोडणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे शहरअध्यक्ष बंधू देशमुख यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -