‘कबीर सिंग’ अडकला इंटरनेट लीकच्या जाळ्यात

Mumbai

नुकताच रिलीज झालेल्या शाहिद कपूरचा कबीर सिंग या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी ही नवी जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली आहे. २१ जूनला कबीर सिंग चित्रपट रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २० कोटींची कमाई केली होती. अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट इंटनेटवर लीक झाला आहे. या प्रकारामुळे कबीर सिंग या चित्रपटाच्या सगळ्या टीमला धक्का बसला असून हा चित्रपट इंटनेटवर लीक झाल्यामुळे कमाईवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या तेलूगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक कबीर सिंग हा चित्रपट आहे. कबीर सिंग चित्रपटात शाहिद कपूरची आणि कियारा अडवाणीची प्रमुख भूमिका आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेला विद्यार्थी हे शाहिद कपूरचे या चित्रपटातील पात्र आहे. तर कियारा ही त्याची प्रेयसी दाखवली आहे. चित्रपटात प्रेयसी सोडून गेल्यामुळे शाहिद कपूर हा व्यसनाच्या आहारी जातो. अशा प्रकारे या चित्रपटाती कथा आहे.

याआधी अनेक चित्रपट इंटरनेटवर लीक झाल्यामुळे त्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची कमाई कमी झाली होती. कबीर सिंग चित्रपट तमिळ रॉकर्स वेबसाईटच्या माध्यमातून सोशल मीडियावर लीक झाला आहे. याआधी देखील या वेबसाईटवर अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक करण्यात आले होते. आता कबीर सिंग हा चित्रपट लीक झाल्यामुळे त्याच्या कमाईवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.