घरUncategorizedराष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याच्या तयारीत

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याच्या तयारीत

Subscribe

बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे नाराज आहेत. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते आज राजीनामा सुपूर्द करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

कालच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानुसार यंदा नवोदित आमदारांना मोठी संधी मिळाली आहे. तर लहान घटकपक्षाचे प्रमुख नेते आणि काही दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे चित्र आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील नाराज आहेत. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते आज राजीनामा सुपूर्द करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

कोण आहेत प्रकाश सोळंके?

राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहेत. त्यांनी भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. दरम्यान कालच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण यामध्ये स्थान न मिळाल्याने सोळंके पक्ष श्रेष्ठींवर नाराज झाले आहेत. आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार ते आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करतील, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र अजून कुडकुडणार; दिल्लीत बोचरी थंडी सुरू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -