कोरोना व्हायरस गुपचुपपणे पसरवणाऱ्या ‘सायलेंट स्प्रेडर्स’ विषयी

MUMBAI

कोरोना विषाणूचं संकट जसं पाय रोवतं आहे तसतसं शास्त्रज्ञांना या विषाणूची विचित्र आणि काळजीत टाकणारी लक्षणं आढळू लागली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सामान्यत: कफताप आणि चव तसंच गंध जाणं ही लक्षणं आढळतात. मात्र अनेकांना यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. या छुप्या रुग्णांमार्फत कोव्हिड-19 पसरतो आहे.