ठाणे मनपाचा कोरोनाला हरवण्याचा फॉर्म्युला

कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे ठाणेकरांची चिंता देखील वाढू लागली होती. ठाण्याच्या रुग्णवाढीचा दर देखील मुंबईखालोखाल वाढू लागला होता. मात्र, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी आपलं महानगर – माय महानगरशी खुल्लम खुल्ला चर्चेमध्ये याबाबत ठाणे महानगर पालिकेने राबवलेल्या मास्टर प्लॅनचा खुलासा केला आहे. ठाण्याने कशा पद्धतीने कोरोनावाढीच्या वेगावर नियंत्रण मिळवलं, याची सविस्तर माहितीच आयुक्त विपीन शर्मा यांनी महानगरकडे स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेचा आदर्श इतर महानगर पालिका देखील घेऊ शकतील, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.