डॉक्टरांवर हल्ले करणारे आणि पेशन्टवर बहिष्कार टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाययोजना केल्या. पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबिय असे एकूण १४ हजारजणांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या महाराष्ट्रात प्रथम नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आल्या आहेत. होम क्वारंटाईन रूग्णांवर सामाजिक बहिष्कार टाकला तर संबंधितांवर ३४१ नुसार कडक कारवाई केली जाईल. कोणी रूग्णास त्रास देत असेल तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल. प्रतिकारशक्ती वाढीसाठी प्रत्येकाने व्यायाम व योगासने करावीत. सात झोप घ्यावी. सोशल मिडीया व मोबाईलच्या आहारी जावू नये. सकारात्मक ऊर्जेसाठी चांगली पुस्तके वाचा. कुटुंबाशी संवाद वाढवा. आईवडिलांशी बोला. मोबाईल सोडा. मस्त विनोदी कार्यक्रम बघा, आयुष्याची मजा लुटा असा मोलाचा सल्ला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘आपलं महानगर’च्या विशेष मुलाखतीत दिली