नाशिकमध्ये Oxygen टँकर न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची वाढतेय. आजवर जिल्ह्यात तब्बल ६० हजार इतके तर एकट्या नाशिक शहरात तब्बल ४१ हजार इतके कोरोना पेशंट आढळून आलेत. दुर्देवाने गेल्या सहा महिन्यांत ७७५ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागलाय. यात मुख्यत: ऑक्सिजनचा पुरवठा योग्यवेळी उपलब्ध न झाल्याने बहुतांश पेशंटचे मृत्यू झाले. आज ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने सध्या गंभीर रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला शंभर टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले. मात्र उत्पादक कंपनीला ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी अवघ्या एका टँकरची आवश्यकता आहे. दुर्देवाने ती देखील व्यवस्था होत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी शोधाशोध करावी लागतेय. या पार्श्वभूमीवर शहरासह नाशिक जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी, सध्या होणारा पुरवठा, पुरवठादारांचे मत, जिल्हाधिकार्‍यांचे मत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचे मत काय आहे या विषयीचा ‘माय महानगर’चा हा स्पेशल रिपोर्ट.