सनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स & मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू

आज आयपीएलमध्ये ‘डबल हेडर’ म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने पाहायला मिळणार आहेत. दुपारी होणाऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादपुढे राजस्थान रॉयल्सचे, तर रात्री होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सपुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. दुपारच्या सामन्यात हैदराबादचे पारडे जड आहे. मात्र, मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना कोण जिंकणार हे सांगणे अवघड आहे. परंतु, हा सामना चुरशीचा होऊ शकेल.