घरव्हिडिओनायब तहसीलदार व उपकार्यकारी अभियंत्यांची कन्येचे यूपीएससीत यश

नायब तहसीलदार व उपकार्यकारी अभियंत्यांची कन्येचे यूपीएससीत यश

Related Story

- Advertisement -

नाशिकची कन्या अंकिता वाकेकर हिने UPSC परीक्षेत यश मिळवले
B. Tech (civil engineering) 2016 मध्ये पूर्ण केल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आल्यानंतर तिसर्‍या प्रयतनात यश मिळवले. ऑल इंडिया 547 वा रँक मिळवत तीने ही कामगिरी केली. आई संघमित्रा बाविस्कर या नायब तहसीलदार व वडील अरविंद वाकेकर हे MSEB मध्ये उपकार्यकारी अभियंता आहेत. आई-वडीलांच्या मार्गदर्शनामुळे यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ध्येय निश्चित केले. दिल्लीत तीन वर्ष दररोज साधारणत: 10 ते 12 तास अभ्यास केला. मराठी माध्यम असेल किंवा इंग्रजी येत नाही म्हणून त्याचा न्यूनगंड न बाळगता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते. अभ्यासाचे योग्य नियोजन केले पाहिजे.अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करावी. संयम ठेवल्यास या यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणे अगदी सोपे असल्याचा मूलमंत्र अंकिताने दिला.

- Advertisement -