३ महिने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ मोफत मिळणार

MUMBAI

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. यामुळे राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.