शांतता, स्वच्छता हीच आंबेडकरांना आंदराजंली

Mumbai

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाणदिन.. या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. शिवाजी पार्क मैदानावर त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली जाते. ५,६ आणि ७ डिसेंबर पर्यंत अनेक लोक शिवाजी पार्क मैदानावर थांबलेले असतात. या दिवशी शिवाजी पार्कात गोगांट होऊ नये, ध्वनिक्षेपक लावू नये, अस्वच्छता पसरवू नये, यासाठी “शांत चैत्यभूमी अभियान”मार्फत जनजागृती केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी निधन झाले. हा दिवस संबंध देशासाठी दुःखद दिन आहे. त्यामुळे या दिवशी शांत राहून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला पाहीजे. त्यांचे विचारांची पुन्हा एकदा उजळणी केली पाहीजे, अशी भूमिका शांत चैत्यभूमी अभियानाच्या सदस्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here