आजोबा, आम्हाला सुखाने जगू द्या | दीक्षाचा व्हिडिओ देखील होतोय व्हायरल

Mumbai

बरेली येथील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांच्या मुलीने पळून जात लग्न केल्यामुळे तिला घरच्यांकडून धमकी मिळत होती. या प्रकरणाचा साक्षीने व्हिडिओ देखील केला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोवरच प्रयागराज येथून आणखी एका भाजप नेत्याच्या नातीचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीचे नाव दीक्षा अग्रवाल असून आपण प्रेमप्रकरणातून लग्न केल्यामुळे आजोब धमकावत असल्याचे म्हटले आहे.