तिकिट मागणाऱ्या कार्यकर्त्याला अजितदादांनी खिशातून तिकिट काढून दिलं

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या गावराण शैलीतील ठसकेबाज भाषणासाठी चांगलेच लोकप्रिय आहेत. अजित पवार जेव्हा जेव्हा भाषण करतात, तेव्हा प्रेक्षकांमधून कार्यकर्ते अमुकतमुक नेत्याला तिकिट द्या, अशी घोषणाबाजी करत असतात. अशा तिकिट मागणाऱ्या कार्यकर्त्याची अजित पवारांनी चांगलीच गोची केली.