वांद्रे पूर्व मतदारसंघ | मनसे उमेदवार अखिल चित्रे

Mumbai

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अखिल चित्रे निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी जनतेमध्ये जात आहेत. मात्र मनसे हा एकमेव पक्ष आहे जो लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याची भूमिका घेत आहे. मागच्या पाच वर्षात सत्ता असूनही शिवसेना-भाजप मुंबईतील जनतेचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत, त्यामुळे माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याची संधी दिली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाण्याची देखील आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे उमेदवार अखिल चित्रे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here