मंदिरे उघडण्यासाठी सरकारने योग्य वेळ साधली

शिवसेनेला हिंदुत्त्वाचा विसर पडलेला नाही. अनलॉक दरम्यान आम्ही टप्प्याटप्प्याने काही गोष्टी उघड्या केल्या होत्या. त्याप्रमाणे आता दिवाळीनिमित्त प्रार्थनास्थळांना उघडण्याची परवानगी देत आहोत. कोरोनामुळे या दिवाळीत राज्य सरकारला फार काही निर्णय घेता नाही आले, मात्र पुढच्या चार दिवाळीत जनतेला चांगल्या निर्णयाची भेट देऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.