खासगी रुग्णवाहिकांना संरक्षण द्या – चालक

Mumbai

करोनाची लागण झालेल्या आणि उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकाच्या चालकांना स्थानिक नागरिक मज्जाव करत आहेत. तर चालकांना धक्काबुक्की करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रुग्णसेवा देणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाण्यातील जीवन अॅम्ब्युलन्सचे जीवन विश्वकर्मा आणि विजय मोहोड यांनी केली आहे.