देश-विदेशातून चाकरमानी निघाले आंगणेवाडीला

Mumbai

कोकणातील नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यंदाच्या जत्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. या जत्रेला मुंबई, पुण्यासह देशा-परदेशातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दीड दिवस चालणार्‍या देवीच्या या जत्रेमध्ये मालवणवासियांचा मोठा उत्साह पहायला मिळतो.