नाईट लाईफबाबत सर्व बाजूने विचार करणार

26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. सर्व बाबींचा विचार करूनच हा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.