भाजप आमदार आशिष शेलार यांचा सरकारला सवाल

परदेशातून भारतात येऊन मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या सुसान वॉकर सारख्या लोकांना परवानगी दिली जाते का, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी कायद्याचे उल्लंघन करुन सुशांत सिंह राजपूतची माहिती मीडियाकडे उघड का केली? पोलीसांची दिशाभूल का करत आहेत. त्यांचा बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय? कुणाच्या आशिर्वादाने? त्यांचा जबाब ग्राह्य कसा धरणार? त्यांची पोलीस, सीबीआय, ईडी चौकशी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.