राज ठाकरेंनी राजकीय अडगळीत पडू नये – आशिष शेलार

Mumbai

२०१३ ते २०१९ हा राज ठाकरेंचा बॅडपॅच होता. त्याचे विश्लेषण ते स्वतः किंवा पत्रकार करतील. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंसारख्या नेत्याने राजकीय अडगळीत पडू नये. नेता म्हणून त्यांचे कर्तृत्व आहेच. त्यांच्याकडे एक दृष्टी आहे, पुढे येऊन धडाडीने नेतृत्व करण्याची क्षमता आहे, स्वतःचे हात उंचावण्याची धमक आहे, तसेच खिशात हात घालण्याची दानत आहे. या कौशल्याचा उपयोग त्यांच्या पक्षाला आणि राज्याला व्हावा. राज ठाकरे राजकीय अडगळीतून बाहेर येऊन मुख्य प्रवाहात यावेत, अशी अपेक्षा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.