मुनगंटीवारांचे स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपने सारखे

Mumbai

एनआयएचा अशा पद्धतीने महाराष्ट्रात हस्तक्षेप व्हावा, हे योग्य नाही. भीमा-कोरेगावसंदर्भातसंदर्भात फेरआढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. पण, त्यानंतर लगेच दोन दिवसात केंद्र सरकार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देते, हे योग्य नाही. त्यासाठी महाराष्ट्राची सहमती घ्यायला हवी होती. किमान चर्चा तरी करायला हवी होती. केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय राहिला नाही तर राज्यांना काम करणे कठीण होईल. राष्ट्रपती राजवटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटते, हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हे सरकार कायम राहू नये, असेही त्यांना वाटत असेल. पण हे त्यांचे हे स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपनेसारखे असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.