सोशल मीडियावरील व्हायरल आयुर्वेदिक काढे आरोग्यास घातक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकांचा कल आयुर्वेदिक काढे आणि औषधे घेण्याकडे वाढू लागला. त्याचवेळी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात काढे बनवण्याच्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले. परंतु यातील बहुतांश काढे हे चुकीच्या पद्धतीने बनवलेले असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. याबाबत नेमके कोणते काढे व औषधे घ्यावे यासाठी महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी ‘आपलं महानगर-माय महानगर’च्या वाचकांना केलेले मार्गदर्शन