राष्ट्रपती राजवटीत लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे नाही का? बच्चू कडू

Mumbai

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून हाता-तोडांशी आलेले पिक वाया गेले आहे. हे वाया गेलेले पिक घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी राज्यपालांचे निवासस्थान राजभवनावर मोर्चा काढला होता. मात्र आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांना आझाद मैदानात हलविण्यात आले. यावेळी माय महानगरने त्यांच्याशी बातचित केली.