खिडकीतून बॅग टाकून सीट अडवणाऱ्यांनो, सावधान!

Mumbai

एसटी स्टँडवर तुम्ही बसच्या खालून खिडकीतून बॅग टाकून जागा पकडता का? मग हा व्हिडिओ एकदा बघाच. नंदुरबार बस स्थानकावरील चोरांची टोळी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मोठ्या शिताफीने काही मिनिटांत ही टोळी गर्दी असलेल्या एसटी स्टँडवरुन बॅग पळवून नेते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सीट अडवत असाल तर एकदा हा व्हिडिओ बघाच…