मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त राज्यभरातून हजारो शिवसैनिकांनी त्यांना आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर सकाळपासूनच येण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला अभिवादन केले.