इगतपुरी तालुक्यातील भावली धरण शंभर टक्के भरले

इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा धरणांपैकी भावली धरण हे शंभर टक्के भरले आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे पूजनाचा कार्यक्रमासाठी भावली येथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे जल पूजनाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने याकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागून होते.