मुंबईत भाजपही दूध आंदोलनात उतरले

दुधाचा खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीकरता राज्यभर दूध आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत आहे. मुंबईत काही ठिकाणी त्यांनी घोषणाबाजी करत दूध उत्पादकाच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत आहे.