भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या पुढाकारामुळे तरुणींची सुटका

ठाण्यातील येऊरमधील सुपरवासी एनजीओने परराज्यातील तरुणींना नोकरीच्या नावाखाली बळजबरीने डांबून ठेवले होते. तसेच त्यांना मानसिक त्रास होत असल्याची तक्रार आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस ढिम्म होते. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी छापा टाकून ९ तरुणींची सुटका केली. याबाबत भाजप नगरसेविका मृणास पेंडसे यांनी व्हिडिओ जारी करत माहिती दिली आहे.