वाढीव वीज बिलाविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

राज्यात वाढीव बिलावरुन राजकारण तापले असून भाजप महिला आघाडीने मुंबईतील महावितरणाचे मुख्यालय प्रकाशगडावर मोर्चा काढला आहे. मोर्चाच्यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. प्रकाशगडासमोर भाजपचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली असून आंदोलकांनी गेटवर चढत आत घुसण्याचा प्रयत्न केला आहे.