मंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज राज्यातील अनेक ठिकाणी मंदिराबाहेर आंदोलन सुरू केली. रस्त्यावर उतरुन उद्धव सरकार हाय हाय, अशा घोषणा देत मंदिरे उघडण्याची मागणी केली.