वीज बिल माफीचा, राज्य सरकारकडून फुसका बार

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव बिले कमी करण्यासाठी दिवाळीपूर्वी वीज बिलांमध्ये सवलत जाहीर केली जाईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, ही घोषणा आता फोल ठरली आहे. दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळाची बैठकही होणार नसल्याने सवलतीची प्रतीक्षा आणखी किती काळ करावी लागणार असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे.