भीषण! CCTV मध्ये कैद झाली हत्या!

इंदौरमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे खरंतर तिथल्या एका रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या CCTV चं फूटेज आहे. मात्र, या सीसीटीव्हीमध्ये एक भयंकर प्रकार कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक हत्येचा गुन्हा रेकॉर्ड झालेला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका महिलेची एक इसम गळा दाबून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शरद श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आधी दबा धरून बसलेला इसम नंतर महिलेला फरफटत नेतो आणि हातातल्या वायरच्या मदतीचे तिची गळा आवळून हत्या करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.