सीएसएमटी प्रतिक्षालय प्रवाशांच्या सेवेत

विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या कमी असली तरी वातानुकूलित प्रतीक्षालय प्रवाशांच्या चांगलेच पसंतीला उतरले आहे. केवळ १० रुपयात तासभर गारेगार आराम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत 500 पेक्षा जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.