अंधेरी, वांद्रे परिसरातही केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान

Mumbai

मुंबई आणि उपनगरात CISF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अंधेरी पश्चिम येथे ६० जवानांची तुकडी आहे. या जवानांना अंधेरी पश्चिम येथील महत्वाच्या स्पॉटवर तैनात करण्यात आले आहे. तर जवान अंधेरी मार्के ८, जुहू गल्ली येथे ६, डी. एन. नगर येथे २४ CISF च्या जवानांना पेट्रोलिंगसाठी ठेवण्यात आले आहे. याच पद्धतीने साकीनाका येथे एक तर वांद्रे पश्चिम या महत्त्वाच्या ठिकाणी CISF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.