चाकरमानी हे आपलेच आहेत, त्यांना चांगली वागणूक द्या

Mumbai

मुंबई-पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मूळचे कोकणातील रहिवासी हे कामानिमित्त मुंबई व पुणे शहरात मोठ्या संख्येने राहतात. मात्र, दोन्ही शहरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून कोकणातील चाकरमानी कोकणची वाट धरू लागले आहे. सध्या कोकणात येणाऱ्या लोकांची १४ दिवस क्वारंटाईन व्यवस्था शाळेत केली जात आहे. परंतु, गावातील काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे, असे क्वारंटाईनमध्ये असलेले व्यक्ती सांगत आहे. तो आधी बदलला पाहिजे. आम्ही कोरोना पॉझिटिव्ह नाही आहोत. मग आम्हाला कोरोनाबाधित रुग्णांसारखी वागणूक का दिली जातेय, असा सवाल ही चाकरमान्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here