शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना डावलले

Mumbai

भाजपमध्ये मागच्या पाच वर्षात झालेल्या मेगाभरतीमुळे पक्षाची संस्कृती बिघडली असे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले आहे. आमच्या पक्षात बाहेरून आलेल्या सर्वांचा आम्हाला फायदाच झाला आहे. आमचा पक्ष नेत्यांचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे आम्हाला नवीन आलेल्या लोकांना सांगायचे असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष होऊ दिले नसल्याचे सांगितले.