चेतन राऊत यांनी एकनाथ शिंदे याचे पोर्ट्रेट साकारले

MUMBAI
ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अशा प्रसंगी राज्याचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावल्यागत जिल्हाभर फिरून अधिकाऱ्यांसोबत कोरोनाला आळा घालण्यासाठी काम करत आहेत. गरजूंना अत्यावश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा मिळवून देत आहेत. त्यांच्या या कामाला सलाम करण्यासाठी त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी जागतिक पातळीवरचे कलाकार चेतन राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे ३ हजार ८८८ पुश पिनपासून २४ इंच बाय १८ इंच आकाराचे पोर्ट्रेट साकारले आहे.