राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह

Mumbai

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९० वी जयंती असून आज देशभरात हा उत्सव साजरा केला जात आहे. तर नाशिक जिल्ह्यात अक्षरश: शिवजयंतीनिमित्त ‘धुरळा’ उडाला. महिलांनी फुगड्या घालत शिवरायांना मानवंदना दिली. तर अनेक शिवभक्तांनी बाईक रॅली आणि मिरवणूक काढत शिवरायांना मानवंदना देत शिवजयंती उत्साहात साजरी केली.